नातेपुते : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत जिल्हास्तरीय पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत नातेपुते येथे जनजागृती मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला माळशिरस तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महिलांचा व युवक वर्गाचा मोठा सहभाग होता.
नातेपुते सोलापूरपासून १५० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे अनेक लोक शासकीय योजनांपासून दूर राहतात. त्यांना योजनेची माहिती होण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम जनजागृती मेळावा आयोजन केल्याची माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे यांनी दिली.या मेळाव्यात बँक, यशस्वी उद्योजक तसेच खादी मंडळाचे अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेविषयी नागरिकांना केंद्रप्रमुख विजयकुमार खडके यांनी सविस्तर माहिती दिली. नागरिकांच्या अडचणी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. आपण जे कर्ज प्रकरण करुन देतो.त्यासाठी कोणाला पैसे देऊ नये. दलाल यांच्यापासून सावध राहिले पाहिजे तसेच शासकीय अनुदान योजना विषयी कोणतीही माहितीसाठी मंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा, अशा सूचना नागरिकांना करण्यात आल्या.
यावेळी नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, डॉ. नरेद्र कवितके, नातेपुते पोलीस स्टेशचे सहा. पोलीस निरिक्षक संपागे, सज्जन कांबळे, दीपक शेळके, चेअरमन दत्ता सावंत, आर. ए. शेख, महिला बचत गट अधिकारी रणजीत शेंडें, भगवान धनंजय, विष्णू थेटे, विनायक सावंत, बिपीन सातपुते, नेहरु युवा मंडळाचे गणेश घुले यांच्यासह युवक युवती, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.