ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांचे सिनेमे बंद पाडू

मुंबई: काँग्रेस सरकारच्या काळात महागाईच्या बॉलीवूडचे अभिनेते सरकारवर टीका करायचे, राण उठवायचे. मात्र आता इंधन दरवाढीवर बॉलीवूडचे अभिनेते चकार शब्दही बोलायला तयार नाही असे सांगत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. नाना पाटोले यांनी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन सिनेमे आणि शुटिंग महाराष्ट्रात बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. मनमोहन सिंग सरकारच्या वेळी ट्विटरच्या माध्यमातून सतत टीका करणारे अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार मोदी सरकारच्या काळात मात्र शांत असल्याची टीका नाना पटोले यांनी केले.

“डिझेल, पेट्रोल आणि गॅसची दरवाढ यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ज्यावेळी मनमोहन सिंग यांचे सरकार होते. तेव्हा अमिताभ, अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून टिवटिव करायचे आणि टीका करायचे. आज ते का शांत आहेत?,” अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे.

“अमिताभ आणि अक्षय कुमार यांचे सिनेमे आणि शुटिंग महाराष्ट्रात चालू देणार नाही. ज्या पद्धतीने ते लोकशाही मार्गाने मनमोहन सिंग यांचं सरकार असताना ट्विट करत होते त्याप्रमाणे आजही मोदी सरकारच्या देशविरोधी धोरणाच्या विरोधात त्यांनी आपली भूमिका मांडावी. अन्यथा महाराष्ट्रात सिनेमे आणि शुटिंग बंद पाडू अशी व्यवस्था करणार आहोत”.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!