प्रभागात होणाऱ्या विकासकामांसाठी स्थानिक नगरसेवक सक्षम : म्हेत्रे, प्रभाग क्र. ४ व ५ मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन
अक्कलकोट, दि.२५ : प्रभागात होणाऱ्या विकासकामांसाठी स्थानिक नगरसेवक सक्षम आहेत. त्यांच्या माध्यमातून शहरात विकास कामे जोरात सुरू आहेत,असे प्रतिपादन दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी केले. अक्कलकोट शहरातील प्रभाग क्रमांक ४ व ५ मधील काँग्रेसचे विद्यमान नगरसेवकांच्या निधीतून झालेल्या विविध विकासकामांचे भुमीपुजन संपन्न झाले.त्यावेळी ते बोलत होते.
प्रभाग ५ चे युवा नगरसेवक सद्दाम शेरीकर, डाॅ.दिपमाला अडवितोटे प्रभाग ४ चे नगरसेविका जुलेखा बळोरगी, विकास मोरे यांनी शासनाच्या विविध योजनेतून अनेक कामे मंजूर केली आहेत. त्याचे भुमिपुजन नगराध्यक्षा शोभा खेडगी व युवा नेते प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी होटकर गल्ली रस्ता व गटार,जनता चाळ काँक्रीट रस्ता,दलित वस्ती रस्ता गटार व दिवे,निमगाव रोड गटार,राजीव नगर झोपडपट्टी शौचालय,अंबाबाई मंदिर परिसर गटार आदी विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आल्याचे सोलापुर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अश्पाक बळोरगी यांनी सांगितले.
शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख, जि.प सदस्य मल्लिकार्जुन पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, सुनिल खवळे, शिवसेना शहरप्रमुख योगेश पवार, फारूख बबरची, बब्बू होटगीकर, म्हताब नदाफ, बाबू नागुरे, इमाम शेख,सत्तार बळोरगी, रमेश चव्हाण, असद फरास, राहुल भकरे, आदिसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.