नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महादेव ॲपच्या मध्य्मातुना अनेक ठिकाणी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सट्टेबाजी सुरु होती, या ॲपला भारतात बंदी घालण्यात आली असून बाकी काही देशात हे सुरु असतांना आता महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला अटक झाली आहे. महादेव बेटिंग ॲपचा मालक रवी उप्पल याला दुबईतून अटक करण्यात आली आहे. रवी उप्पल विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ही अटकेची कारवाई झाली आहे.
रवी उप्पलसोबतच इतर दोन जणांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सौरव चंद्राकर आणि रवी उप्पल या सगळ्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. ईडीकडून या दोघांचा शोध सुरु होता. या दोघांच्या विरोधात ईडीने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. याच नोटीसच्या आधारे दुबईच्या स्थानिक पोलिसांनी रवी उप्पला अटक केली आहे. महादेव ॲप सट्टेबाजीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. इथं लोक ऑनलाईन सट्टेबाजी केली जात होती. या ॲपला भारतात बंदी घालण्यात आली आहे. पण इतर देशांमध्ये हे ॲप अद्यापही सुरु आहे. छत्तीसगडमधील चंद्राकर आणि त्याचा सहकारी रवी उप्पल याला दुबईत बसून चालवत होते. या दोघांच्या विरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं.
सौरव चंद्राकर हा आधी रायपूरमध्ये एक ज्यूस सेंटर चालवत होता. त्यानंतर तो सट्टेबाजीमध्ये सहभागी झाला. सौरव आणि रवी यांच्याकडे सहा हजारांहून अधिक संपत्ती असण्याचा संशय आहे. हवालाच्या माध्यमातून रोकड दुबईला पाठवण्यात आली. तपास यंत्रणांना संशय आहे की दाऊद इब्राहिम टोळीने दुबईतून महादेव बुक अॅप इतक्या मोठ्या प्रमाणावर चालवण्यासाठी मदत केली.