ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात लॉकडाउन अटळ ? सूत्रांची माहिती

मुंबई : मी राज्यात आज लॉकडाउन जाहीर करत नसलो तरी संपूर्ण लॉकडाउनचा इशारा देत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले होते. राज्यात संसाधने अपुरी पडू लागली असून जर करोना रुग्णवाढ अशीच कायम राहिली तर येत्या १० ते १५ दिवसांमध्ये रुग्णालयांमधील बेड्स आणि साधने अपुरी पडतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हंटले होते.

कालच्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना लॉकडाउन विरोधी पक्षांसह अनेक घटक राज्यात लॉकडाउन नको असे म्हणत आहेत. मात्र करोनाला रोखायचे कसे याबाबत कोणीच मार्ग सांगत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्यसुविधांचा आढावा देखील घेतला होता.

कोरोनाला रोखायचे कसे याबाबत तज्ज्ञांशी बोलून लवकरच निर्णय घेणार असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर राज्याला सध्या लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचे सरकारचे मत बनले असून आता सरकार केव्हाही लॉकडाउन घोषित करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रशासनानेही त्या दृष्टीने हालचाली करण्यास सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!