ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जेऊरच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात २१ जोडपी होणार विवाहबद्ध

 

अक्कलकोट, दि.२० : : अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील काशिलिंग देवस्थान ट्रस्ट व श्री काशीलिंग बहुऊद्देशिय संस्थेच्या वतीने शनिवार दि. २२ एप्रिल रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे.येथील श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक भवन जेऊर येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने यंदा सीमेवर कार्यरत तसेच शाहिद सैनिक कुटुंबीय अशा एकूण २७ सैनिक बांधवाचा सन्मान सोहळा होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.यावेळी जगद्गुरुंसह विविध मठाचे मठाधीश उपस्थित राहणार आहेत.ग्रामीण भागात सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे आर्थिक अडचण तसेच वाढत चाललेली प्रचंड महागाई यामुळे नागरिकांना आपल्या मुलामुलींची लग्ने लावणे आणि त्याची जबाबदारी हे खूपच खर्चिक आणि न झेपणारे ठरत आहे.त्यामुळे यंदा जेऊरला कोरोनाकाळ वगळता सलग ८ व्या वर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजीला जात आहे.या संस्थेत एकूण दोनशे मित्रपरिवार सदस्य एकत्र येऊन तन,मन धनाने योगदान देत आहेत.काशीलिंग बहुउद्देशीय संस्थेच्या मल्लिकार्जुन पाटील व मित्रपरिवारांकडून सहा वर्षात १३४ जोडपे विवाहबद्ध झाली आहेत तर चालू वर्षी एकूण २१ जोडप्यांचा विवाह त्या – त्या धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न सोहळा पार पडणार आहे.या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.दरवर्षी साधारण पन्नास हजार वऱ्हाडी मंडळी उपस्थित राहत असतात.यात प्रामुख्याने वधू वरांना पोशाख, मणी-मंगळसूत्र,वऱ्हाडी मंडळींना,गावातील मुख्य रस्त्यावरून वधू वरांची मिरवणूक, भोजन,शिदोरी आदींची व्यवस्था केली आहे.या विवाह सोहळ्याचे नियोजन काशीलिंग देवस्थान ट्रस्ट व काशिलिंग बहुउद्देशीय संस्था तसेच कार्यकर्ते
व ग्रामस्थ मंडळी जेऊर हे करीत आहेत.

यंदा सैनिक
सन्मान सोहळा

या ट्रस्टच्यावतीने आणि मल्लिकार्जुन पाटील यांच्या संकल्पनेतून अक्कलकोट तालुक्यातील सध्या सीमेवर कार्यरत असलेल्या आणि गावाकडे आलेल्या २२ सैनिकांचा आणि तालुक्यातून सेवेत असताना शहिद झालेल्या जवानांच्या पाच कुटुंबियांचा सन्मान देखील यावेळी केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!