अक्कलकोट : आचेगाव येथील डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्प उभारणीचे काम युद्धपातळीवर चालू आहे. सिव्हिल विभागाची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्प पुढील गळीत हंगामात पूर्ण क्षमतेने चालू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन पिसे यांनी सांगितले.
गुरुवारी,यासंदर्भात कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार
परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना पिसे म्हणाले की, मिल व उत्पादन विभागातील मेन्टेनन्सची कामे जलद गतीने चालू
आहेत. सदर मेन्टेनन्स कामासाठी लागणारे मटेरियल मागील गळीत हंगाम सुरू असतानाच मागवले आहे. त्यामुळे लॉक डाऊनचा मशिनरी दुरुस्तीच्या कामावर काहीही परिणाम झालेला नाही.सहवीज निर्मिती प्रकल्पातील बॉयलर , टरबाईन विभागाची दुरुस्ती व देखभालीची कामे गतीने सुरू आहे. इलेक्ट्रिकल विभागाची पॅनल मेन्टेनन्स व टेस्टिंगची कामे नियोजनबद्ध चालू आहेत.
केंद्र सरकारच्या रिलीज ऑर्डर प्रमाणे शुगर सेल विभागाकडून साखर विक्री चालू आहे. अकौंन्ट विभागात वैधानिक लेखापरीक्षणचे काम चालू आहे. आर्थिक वर्ष २०२०- २१ वैधानिक लेखापरीक्षण महिनाअखेरपर्यंत पूर्ण होईल. शेती विभागाकडून पुढील गळीत हंगामासाठी ऊस नोंदणी करण्याचे काम चालू आहे.आज पर्यंत वीस हजार हेक्टरच्या नोंदी झालेल्या आहेत अजून दहा हजार हेक्टरची नोंद अपेक्षित आहे.पुढील गळीत हंगामात दहा ते बारा लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल.
गळीत हंगाम २०२१- २२ मध्ये उसाची उपलब्धता जादा असल्याने जय हिंद शुगरचे सर्व कर्मचारी जोमाने कामास लागलेले आहेत व गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी एक महिना अगोदर सर्व कामे पूर्ण करण्याचा संकल्प सर्व कर्मचाऱ्यांनी केलेला आहे,असे पिसे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला व्हाईस चेअरमन विक्रमसिंह पाटील,चीफ को-ऑर्डिनेटर अमोल जगताप उपस्थित होते.
★ उद्योजकांना वेठीस धरणे अयोग्य
जयहिंद शुगरला शासकीय संस्थांकडून
२७ कोटी रुपये येणे आहेत ते मागील वर्षापासून प्रलंबित आहेत.त्यात शेतकऱ्यांचे ऊस बिल व इतर देणी २५ कोटी रुपये आहेत. ऊस उत्पादक शेतकरी ,ऊस
तोडणी वाहतुकदार व कर्मचारी सर्वजण कारखानास्थापनेपासून जय हिंद
शुगरच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कारखान्यास बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.यानिमित्ताने उद्योजकास वेठीस
धरणे हे दुर्दैवी आहे,अशी नाराजी
जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश
माने देशमुख यांनी व्यक्त केली