सोलापूर दि. १६ – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचे विभागिय साहित्य संमेलन यंदाच्या वर्षी मंगळवेढा येथील महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजी नगर शाखेला देण्यात आले असून नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे संमेलन होईल अशी माहिती विभागीय संमेलनाचे समन्वयक आणि मसाप पुणे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी यांनी दिली.
मंगळवेढा येथे विभागीय साहित्य संमेलनाच्या संदर्भात संमेलनाचे निमंत्रक तानसेन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचे अध्यक्ष प्रकाश जडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मसाप पुणे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी आणि कल्याण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत विभागीय साहित्य संमेलनाची घोषणा करण्यात आली. याच वेळी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची तर कार्याध्यक्षपदी दिगंबर भगरे, कार्यवाहपदी माजी प्राचार्य डॉ. सुभाष कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
हे विभागीय साहित्य संमेलन नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असुन लवकरच संमेलनाच्या तारखा आणि संमेलनाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात येईल असे यजमान मसाप.दामाजीनगर शाखेचे अध्यक्ष प्रकाश जडे यानी या बैठकीत सांगीतले. मंगळवेढ्याला संत चोखामेळा, संत दामाजी आणि संत कान्होपात्रा यांची साहित्य परंपरा आहे. मंगळवेढ्याच्या संत दामाजी नगरीत हे विभागीय साहित्य संमेलन होत असल्याने शाखेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्साह दाखवला आहे.
याच बैठकीत नटसम्राट बालगंधर्व स्मृती दिनाचे औचित्य साधून नाट्यकलावंत लक्ष्मण नागणे यांचा सत्कार करण्यात आला तसेच पुणेचा मसाप कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्या बद्दल कल्याण शिंदे, आणि पत्रकारीता विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल कार्यकारणी सदस्य डॉ.अतुल निकम यांचा विभागीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सभेचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. दत्ता सरगर यांनी केले. यावेळी मसाप सोलापूर शाखेचे प्रमुख कार्यवाह मारुती कटकधोंड, मसाप. दामाजी नगरचे कार्यवाह संभाजी सलगर, लहु ढगे, सचिन गालफाडे, गोरक्ष जाधव, पोपट महामुरे, रेखा जडे, भारती धनवे आदी उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.