ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठवाडा मुक्तीसंग्रामात सोलापूर शहराचे मोठे योगदान; पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांचे प्रतिपादन

 

सोलापूर (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्य लढ्यानंतरचा सर्वात मोठा स्वातंत्र्यसंग्राम म्हणून मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा ओळखला जातो. मात्र या लढ्यामध्ये सोलापूर शहराचेही मोठे योगदान आहे. कारण या मुक्तीसंग्रामासाठी लागणारी सर्व प्रकारची रसद ही सोलापूर शहरातून जात होती. त्याचबरोबर मुक्तीसंग्रामातील क्रांतीकारक जखमी झाल्यानंतर सोलापूरमध्येच त्यांच्यावर उपचार केले जात होते. त्यामुळे मराठावाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यामध्ये सोलापूरचे वेगळे महत्व असलेल्या सोलापूरला विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन सदर बझार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी केले.
यावेळी सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष विवेक वंसतराव पाटील, पत्रातालीमचे श्रीकांत घाडगे, ऍड. शांतीवीर महिंद्रकर, प्रसिध्द शिल्पकार श्री. डोंगे, उद्योजक धीरेन गडा, दुशांत अंबरशेट्टी आदी उपस्थित होते.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सोलापूर मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी प्रस्ताविक केले. यावेळी बोलाताना विवेक पाटील म्हणाले, आज अफगानिस्तानातील परिस्थिती संपूर्ण जगाने पाहिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम हा यापेक्षाही संघर्षमय राहिलेला आहे. त्यामुळे मराठावाडा मुक्तीसंग्रामाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे. मराठवाडा मित्रमंडळाच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून मुक्तीदिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले जाते. मराठवाड्यातील नागरिकांसोबतच सोलापुरातील नागरिकांचाही यावेळी मोठा सहभाग असतो. मात्र कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्बंध पाळून आम्ही हा छोटेखानी अभिवादन सोहळा पार पाडत आहोत. भावी पिढीला या संघर्षाच्या माध्यमातून मोठी प्रेरणा मिळत राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत घाडगे यांनी केले तर धीरेन गडा यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!