ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना पद्म पुरस्कारासाठी निसर्गप्रेमींचा पुढाकार

 

सोलापूर, दि.१६ : महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात प्रदीर्घ काळ सेवा करुन वन्यजीव आणि विषेशता पक्षीकोषाची निर्मीती करुन निसर्गाची किमया जगासमोर मांडणारे ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी देशासाठी केलेल्या त्यांच्या कार्याची दखल म्हणून भारत सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे ह्या करिता गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव सह महाराष्ट्रातील निसर्गप्रेमींच्या वतीने भारत सरकारला अॉनलाईन प्रस्ताव पाठविण्यात आले आहे.

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक उत्तम साहित्याची निर्मिती केली, केंद्र आणि विविध राज्य सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले. देशा विदेशातील निर्सगप्रेमी तथा साहित्य जगतात अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना आदरयुक्त सन्मानाचे स्थान आहे. निर्सग आणि साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी आणि योगदान देणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार सन्मानित करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील निसर्गप्रेमी आणि साहित्य वर्तुळातून केली जात आहे.

नुकतेच अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी त्यांची कर्मभूमी विदर्भातुन मातृभूमी सोलापूरात आपले कार्य अविरत सुरू ठेवण्याचे निश्चित केले. आयुष्यभर साहित्य तथा पर्यावरण क्षेत्रात अमुलाग्र कामगिरी करणाऱ्या मारुती चितमपल्ली यांना ह्यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यामुळे सामन्याना माहिती नसलेले निसर्गाचे अनेक पैलू समजले आणि त्याचा फायदा शासनाच्या वन विभाग आणि संशोधन करणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!