ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सीमावर्ती भागातील कन्नड भाषिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच बैठक; डॉ.सोमशेखर

गुरुषांत माशाळ
दुधनी : महाराष्ट्र शासनाच्या सावत्र आईच्या भूमिका आणि सहकार मिळत नसल्याने महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील कन्नड भाषिकांची स्थिती चिंताजनक झाली असून कर्नाटक सीमा विकास प्राधिकरण नेहमीच महाराष्ट्र कन्नड भाषिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि लवकरात लवकर कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री सोबत सीमावर्ती भागातील कन्नड भाषिकांच्या विविध समस्येचे निराकरण करण्यासाठी बैठक बोलाविण्यात येईल असे कर्नाटक सिमाभिवृध्दी प्राधिकार बेंगळुरूचे अध्यक्ष डॉ. सी.सोमशेखर यांनी सांगितले.

नुकतेच आदर्श कन्नड बळग महाराष्ट्राचे नियोग बेंगळूरला जाऊन अध्यक्ष डॉ. सी.सोमशेखर यांच्या बरोबर बैठक घेऊन विविध समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले.या वेळी ते बोलत होते. डॉ. सी. सोमशेखर यांनी पुढे बोलून महाराष्ट्रातील कन्नड साहित्य आणि संस्कृतीच्या विकासासाठी सीमा साहित्य व संस्कृती महोत्सव दरमहा आयोजित केला जाईल. दरवर्षी सीमावर्ती भागातील विशेष साहित्यिक साधकांना डॉ. जयदेवीताई लिगाडे आणि कैयार किन्नणय रै यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार असल्याचे ते सांगितले.

महाराष्ट्रातील कन्नड शाळांच्या अस्तित्वासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. सीमेवर, कन्नडसाठी संघर्ष करणार्‍यांची स्मारके उभारली जातील. सोलापुरातही डॉ. जयदेविताई लिगाडे यांच्या स्मारक उभारण्यासाठी प्राधान्य दिले जाईल म्हणून जाहीर केले.

महाराष्ट्र सरकारच्या दुहेरी धोरणामुळे आणि कर्नाटक सरकारच्या दुर्लक्षाचा फटका महाराष्ट्रातील कन्नडिगांना बसला आहे. “कर्नाटक सरकारने सतर्क असले पाहिजे आणि आमच्या समस्या त्वरित सोडवल्या पाहिजेत म्हणून आदर्श कन्नड बळगचे सचिव व कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात असलेले सोमशेखर जमशेट्टी यांनी सांगितले.

या बैठकीला कर्नाटक सीमा विकास प्राधिकरणाचे सचिव प्रकाश मथीहळळी, आदर्श कन्नड बळगचे अध्यक्ष मलिकजान शेख, सचिव सोमशेखर जमशेट्टी, खजिनदार शरणप्पा फुलारी, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष गुरुबस वग्गोली, कलमेष अडळट्टी, शरणू कोळी आणि बिरेश खोती उपस्थित होते.

“कर्नाटक सीमाभिवृद्धी प्राधिकरण अनेक वर्षांपासून सीमावर्ती भागातील कन्नड भाषिकांच्या आणि कन्नड भाषा अभिवृद्धीसाठी निरंतर काम करत आहे. कर्नाटक सरकारने मराठा विकास प्राधिकरणाला ५० कोटी रुपये दिले आहेत. दिले आहे. परंतु सीमाअभिवृद्धी प्राधिकरणाला केवळ पाच कोटी रुपये देण्यात आले. कर्नाटक सरकारने सीमाभिवृद्धी विकास प्राधिकरणाला दरवर्षी ६० कोटी रुपयांचे अनुदान द्यावे” – मलिकजान शेख (अध्यक्ष, आदर्श कन्नड बळग, महाराष्ट्र)

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!