ध्यास विश्वसार्ह बातमीचा

BREAKING…! तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हांडांची मोठी घोषणा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड तालुक्यातील कळीये गावचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी सर्व पीडित नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर आता राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तळीये गावासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

‘कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती’, असं ट्वीट करुन जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाने घेतलेल्या जबाबदारीची माहिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायानं जितेंद्र आव्हाड यांच्या या निर्णयामुळे तळीये गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “गावाच्या पुनर्वसनाचं ठिकाण अजून ठरलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी तळीये गावकऱ्यांना सांगितलं, शासन तुमच्या मागे उभं आहे. धोकादायक परिस्थितीत जी घरं आहेत, ती सुरक्षित ठिकाणी वसवणं आवश्यक आहे. ही सुरुवात आहे. आम्ही स्वत:हून हा निर्णय घेतला. शरद पवारसाहेबांशीही चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी सूचना केली होती म्हाडाने अशी घरं बांधून द्यावी. त्यामुळे आम्ही घरं बांधून देणार आहोत. छान सुंदर, कोकणातलं गाव उभं राहील, हे म्हाडा करेल”

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!