ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार : आमदार प्रणिती शिंदे

विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा दुसरा दिवस

सोलापूर : येत्या अधिवेशनात विदयापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आवाज उठवणार असल्याचे आश्वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले.

विद्यापीठ व महाविद्यालतीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. आमदार शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आंदोलनस्थळी भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
दुसऱ्या दिवशी विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात, महासंघ उपाध्यक्ष सोमनाथ सोनकांबळे, प्रतिनिधी संतोष क्षीरसागर, सरचिटणीस रविकांत हुक्कीरे, उपाध्यक्ष कांचन आघाव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. तसेच आंदोलनस्थळी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे, पदमजादेवी मोहिते पाटील, सचिन गायकवाड, डॉ सुशील कुमार शिंदे, डॉ शिरीष शिंदे, माजी सदस्य डॉ. हनुमंत आवताडे, विद्यापीठ परिसर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. गौतम कांबळे, सचिव डॉ. प्रभाकर कोळेकर आदींनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!