ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आमदार रोहित पवार यांनी दिले सोलापुरातील फ्रंटलाईन वर्करसाठी 11 हजार एनर्जी ड्रिंक; बारामती ऍग्रोचा उपक्रम

सोलापूर – कोरोनाच्या काळात प्रशासनाच्या सर्वच विभागातील कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्करनी चांगल्या पध्दतीने काम केले आहे. या कर्मचार्यांची इम्युनिटी पॉवर चांगली रहावी यासाठी शासन आणि इतर सामाकिक संस्था, संघटना मदत करीत आहेत. राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी बारामती ॲग्रोच्या माध्यमातून सोलापूर जिल्हयातील फ्रंटलाईन वर्करना 11 हजार एनर्जी ड्रिंक देण्यात आले. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर यांच्य मार्फत हे एनर्जी ड्रिंक प्रत्येक विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, माजी नगरसेवक दिपक राजगे, सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात उपस्थित होते. यावेळी सुहास कदम, लखन गावडे, महेश कुलकर्णी बिरप्पा बंडगर, मिथून लोखंडे, सिध्दनाथ चव्हाण, बारामती ऍग्रोचे अप्पासाहेब केचे, दत्तात्रय सावंत उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी बारामती एग्रोच्या माध्यमातून फ्रंटलाईन वर्करना हे एनर्जी ड्रीक पाठविले आहेत. कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाला हातभार म्हणून हा उपक्रम राबविल्याचे भारत जाधव, प्रशांत बाबर तसेच बारामती ऍग्रोचे अप्पासाहेब केचे यांनी सांगितले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकरी भारत वाघमारे, पोलीस उपअधिक्षक सुर्यकांत पाटील, शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता ठाकूर, पालिका उपयुक्त धनराज पांडे यांनी बारामती ऍग्रो आणि रोहित पवार यांचे आभार मानले.

सोलापूर जिल्हा प्रशासनासाठी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा पोलीसांसाठी पोलीस उपअधिक्षक सुर्यकांत पाटील यांच्याकडे तर आरोग्य कर्मचार्यांसाठी अधिश्ठाता ठाकूर यांच्याकडे हे एनर्जी ड्रींग सुपुर्त करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद कर्मचार्यांसाठी सीईओ दिलीप स्वामी, महापालिका कर्मचार्यांसाठी उपायुक्त धनराज पांडे तर सोलापूर शहर पोलीसांसाठी पोलीस निरिक्षक मोगल यांच्याकडे एनर्जी ड्रिंक देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!