ध्यास विश्वसार्ह बातमीचा

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे योजनेतून आ.विजयकुमार देशमुख यांनीच कामे केली, येणाऱ्या काळात तालीम बांधून देणार

सोलापूर – प्रभाग ५ अ बाळे, केगाव जोशी गल्ली येथे सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून ३९ लाख रुपये मंजूर निधी मधून काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन आ.विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते व प्रभागातील नगरसेविका स्वाती आवळे नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. केगाव भागामध्ये तालीम बांधण्यासाठी जागा सुचवावी व पत्र द्यावे मी येणाऱ्या काळात तालीम बांधून देईन त्याभागतील युवकांनी जिम साहित्य व जिम बांधून देण्याची मागणी करताच तात्काळ तेही मी बांधून देईन असे आश्वासन माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांनी बोलताना दिले.

आ.विजयकुमार देशमुख पालकमंत्री होते त्यावेळेस दलित वस्ती सुधारणेसाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून ६ किटींचा निधी मंजूर केलेला होता. त्यातूनच आज ३९ लाखांच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. नगरसेविका स्वातीताई आवळे यांच्या १० लाख रुपयांच्या भांडवली निधीतून ड्रेनेज लाईन च्या कामाचे उद्घाटन प्रभागातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा ५ लाख रुपयांच्या उपस्थितीत करण्यात आले. देखील प्रश्न सोडविलेला आहे येणाऱ्या काळात उरलेली कामे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून कामे करू. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून आ.विजयकुमार देशमुख यांनीच कामे केली आहेत असे सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे, राजाभाऊ आलूरे, विनय ढेपे, पै.कैलास दोरकर, नंदू चौगुले, श्रीकांत रणदिवे, गणेश पाटोळे, संतोष दोरकर, ए.आर.फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य सदस्य पै.संभाजी भोसले, धोंडिबा सरवदे, पै.नागनाथ भोळे, युवराज भोसले, पै.शाम भोसले, पै.राहूल सरवदे, पै.संतोष सरवदे, पै.राजू शिंदे, पै.रानू दोरकर, पै.मारूती दोरकर, पै.नितीन इगवे, पै.सौरभ इगवे, पै.सोमनाथ दोरकर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!