मुंबई : ठाण्यातील कासारवडवली येथे कर्तव्य बजावत असताना फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या कर्तव्यदक्ष सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ला हा दुःखद आहे, मात्र अशा प्रकारचा हल्ला करणाऱ्याची हिंमत ठेचून काढली पाहिजे, असे मत महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.
आमचे आंदोलन हे अधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात नसून अनाधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात असल्याचे सांगून पोलिस आणि न्यायालय उचित कारवाई केली जाईल असा आम्हाला विश्वास असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची भेट घेतल्या नंतर राज ठाकरे यांनी ठाण्याचे पोलीस उपायुक्त यांच्याशी चर्चा करुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. त्यानंतर राज ठाकरे यंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पोलिस त्या फेरीवाल्यावर कठोर कारवाई करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसंच कल्पिता पिंपळे यांना तुम्ही लवकर बरं व्हा, असे सांगितल्याचे म्हणाले.