ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरातून संचलन

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट,दि.६ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आज विजयादशमी निमित्त शहराच्या प्रमुख मार्गावरून सघोष संचलन करण्यात आले. संचलन मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी फटाक्याची आतिषबाजी व स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करीत स्वागत केले. या संचालनाला चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळी आठ वाजता बस स्थानक समोरील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सघोष संचलनासाठी सर्व एकत्र आलेले होते. संघाच्या प्रार्थनेनंतर संचालनास प्रारंभ करण्यात आला.

 

दोन वाहिन्यानंतर ध्वज व त्यानंतर घोष पथक संचलनात सहभागी झाले होते. श्री मल्लिकार्जुन मंदिर, हन्नुर रोड मार्गे समाधी मठ, कारंजा चौक, मौलाली गल्ली, आझाद गल्ली, माळे गल्ली,ड बरे गल्ली, देशमुख गल्ली, भारत गल्ली, राम गल्ली, सुभाष गल्ली मार्गे मेनरोड कापड लाईन, सावरकर चौक, राजे फत्तेसिंह चौक, श्रीमंत कमलाराजे चौक येथील विठ्ठल मंदिरात संचलनाचा समारोप करण्यात आला. चौकाचौकात फटाक्याची आतिषबाजी करून व स्वयंसकांवर पुष्पवृष्टी करून नागरिकांनी स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक उभे राहून स्वागत करीत होते. श्रीमंत कमलाराजे चौकातील देवस्थानच्या श्री विठ्ठल मंदिरात संचलनाचा समारोप करण्यात आला.

या संचलनात आमदार सचिन कल्याणशेट्टी, मल्लिनाथ स्वामी, नगरसेवक महेश हिंडोळे, आनंद तानवडे, उद्योगपती विलास कोरे, सचिन सुरवसे, आप्पाशा धनशेट्टी, प्रसाद हारकुड, तम्मा शेळके, भीमराव साठे, अमित कोथिंबरे, कांतु धनशेट्टी, शिवशंकर स्वामी, बसवराज साखरे, अंकुश चौगुले, शिवशरण इचगे, संतोष पराने, ऋषी लोणारी, रमेश कापसे, डॉ.आदित्य कोतवाल, राहुल वाडे, प्रशांत केसकर, अमित थोरात, अभिजित लोके आदीसह बहुसंख्य स्वयंसेवक व हिंदू प्रेमी नागरिक सामील होते.

या संचलनाच्या यशस्वीतेसाठी तालुका संघचालक रवींद्र जोशी, तालुका कार्यवाह चंद्रकांत जकापुरे, गुरुलिंगप्पा येळमेली, संदीप कटकधोंड, चेतन जाधव, संतोष वगाले, अप्पू कलबुर्गी, शिवानंद गुंजे, आदित्य जोशी, आनंद देसाई, आनंद मोर्डे, महेश वागदरे, विजय अळविकर, आदीनी प्रयत्न केले. पोलिसांनी संचालनाच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

तसेच विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजनाचा कार्यक्रम सायंकाळी श्री मल्लिकार्जुन मंगल कार्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ.राजेंद्रकुमार पाटील हे तर प्रमुख वक्ते म्हणून सोलापूरचे आप्पाशा धनशेट्टी हे होते. व्यासपीठावर तालुका संघचालक रवींद्र जोशी होते. शस्त्र पूजनानंतर प्रमुख वक्ते व प्रमुख पाहुण्यांचे समायोचित भाषण झाले. या कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कार्यवाह चंद्रकांत जकापुरे यांनी तर आभारप्रदर्शन गुरुलिंगप्पा येळमेली यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!