ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी ; भाजप कार्यकर्त्यांचे राजीनाम्यांच सत्र सुरू

बीड : बीडचे खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांचे राजीनामे सत्र सुरू आहे. एकाच दिवसात पंचवीस जणांनी राजीनामे दिली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदावरून डावलल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप कार्यकर्ते नाराजी सत्र सुरूच आहे. जिल्ह्यातील ११ तालुका अध्यक्षांनी राजीनामे दिले आहे. भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सुपूर्द सर्व तालुकाध्यक्षांनी आपले राजीनामे सादर केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!