ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत खासदार राहूल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

नवी दिल्ली : आज लोकसभेत काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मोदी सरकारला केली.

खासदार राहुल गांधी म्हणाले की, ३० नोव्हेंबरला कृषीमंत्र्यांना विचारले होते की, आंदोलनात किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता? त्यानंतर ते म्हणाले होती की, माझ्याजवळ कोणतेही आकडे नाही आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी लोकसभेत मृत शेतकऱ्यांची यादी सादर केली आणि पुढे म्हणाले की, पंजाब सरकारने ४०० शेतकरी कुटुंबियांना ५ लाख रुपये दिले आहेत. याशिवाय १५२ शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याला सरकार नोकरी दिली आहे.

याबाबत माझ्याकडे यादी आहे. याव्यतिरिक्त आम्ही हरयाणाच्या ७० शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे. परंतु तुमचे सरकार म्हणते की, आपल्या जवळ शेतकऱ्यांची यादी नाही. मला असे वाटते की, सर्व शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत आणि मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नोकरी दिली पाहिजे. पण आता सरकारने नुकसान भरपाई आणि रोजगाराबाबतची माहिती द्यावी, अशी मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!