ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे पास बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली लक्ष घालण्याची विनंती

मुंबई : मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी तातडीने द्यावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत केली आहे.

याशिवाय मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे पास बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. मंत्रीमंडळात मंत्र्यांची संख्या कमी असून एक – एक मंत्री सहा ते सात खाती सांभाळत आहे तर पाच-सहा जिल्ह्यांना एक पालकमंत्री आहे.यामुळे कामे अतिशय धीम्या गतीने होत आहेत. याशिवाय मंत्री देखील क्वचितच मंत्रालयात उपलब्ध असतात याबाबत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून या कामगारांना न्याय द्यावा अशी विनंतीही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!