ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी ; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटकरून दिली माहिती

चिंचवड : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. पुण्यात पोटनिवडणुकीत कसबा मतदार संघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करण्यात आला होता. मात्र, पिंपरी-चिंचवड येथील उमेदवार घोषित करण्यात आला नव्हता. या उमेदवारी बाबत कमालीचा सस्पेन्स बाळगण्यात आला होता. अखेर हा सस्पेन्स दूर करण्यात आला असून राष्ट्रवादीने आयात उमेदवाराला संधी न देता पक्षातील नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट म्हंटले आहेत की, “चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे”. असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपने उमेदवार घोषित केल्या नंतर महाविकास आघाडी तर्फे उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. असे असतांना महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार या कडे सर्वांचे लक्ष लागून होते. महाविकास आघाडी कडून आयात उमेदवार राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. दरम्यान, काल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पिंपरी मतदार संघात सर्व इच्छुकांची बैठक घेतली होती. यावेळी उमेदवार हा पक्षातील असावा असा आग्रह धरण्यात आला होता. त्यानुसार राहुल कलाटे यांचे नाव बाद करत पक्षातील नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!