नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा दिल्लीतील निवास्थानी पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रातील दावे खोटे ठरवले आहे. गृहमंत्री फेब्रुवारीच्या महिन्यात कोरोनामुळे रुग्णालय आणि नंतर होम आयसोलेशनमध्ये होते. मग देशमुखांनी सचिन वाझेंना बोलावून वसुलीचे आदेश दिले असे परमबीर सिंग कशाच्या आधारावर म्हणतात? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. त्या बरोबर सचिन वाझे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भेटीची माहिती चुकीची असल्याचा दावा शरद पवार यांनी या वेळी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत फेब्रुवारी महिन्यातील घटनाक्रम वाचून दाखवले. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख या काळात रुग्णालयात असल्याचे कागदपत्रंही त्यांनी सादर केले. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे असे ही पवार म्हणाले.