मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोरोना लस घेतली. सोबतच पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी ही लस घेतली. आज सोमवारी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात त्यांनी लस घेतली. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. ज्येष्ठ नागरिकांनाही कोरोनाची लस दिली जात आहे. आजपासूनच त्याला सुरुवात झाली आहे.