अक्कलकोट, दि.३० : राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर यांच्या हस्ते अक्कलकोट पंचायत समितीचे नूतन सभापती आनंदराव सोनकांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे, माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष अप्पू पराणे, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश पवार, रिपाइंचे शहर अध्यक्ष प्रसाद माने, दत्तात्रय माडकर, माळी महासंघाचे शहर प्रमुख सिध्दाराम माळी, बादोल्याचे उपसरपंच सिध्दाराम बिराजदार, धोंडीबा कुंभार आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना नूतन सभापती आनंदराव सोनकांबळे म्हणाले की , माझ्या कार्यकाळात मी कोणत्याही प्रकारचा जात, पात, धर्म, पक्षपात न करता सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी नेहमीच उपलब्ध असेन. जनतेने कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. मला मिळालेल्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही यापुढेही आपले प्रेम असेच राहू दे अशी भावना व्यक्त केली.