पीक विमा वाटपाबाबत प्रशासन ऍक्शन मोडवर, ‘’या’’ तारखेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा
पुणे : शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. पीक विमा वाटपाबाबत प्रशासन ऍक्शन मोडवर आहे. दिवाळीपूर्वी म्हणजेच १४ ऑक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ही दिरंगाई टाळण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांना स्पष्ट निर्देश देऊन संघटनांशी बातचीत करून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर शंभरटक्के नुकसान भरपाईची रक्कम १४ ऑक्टोबरपर्यंत जमा करावी असे निर्देश देण्यात आले होते. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात ही नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. आता पीक विमा वाटपास झालेली हीच दिरंगाई टाळण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून यावर ऍक्शन घेण्यात येणार आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी सरकारकडून तब्बल तीन हजार पाचशे एक कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात ही नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत वाटप करण्यास का विलंब होत आहे.