ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्हा परिषदेच्या वतीने सरपंचासाठी शनिवारी स्वच्छता संवाद उपक्रम- मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य व सरपंच यांच्यासाठी स्वच्छता संवाद कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. २५ सप्टेंबर रोजी करणेत आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या व्हीडीओ काॅन्फरन्स कक्षातून ऑनलाईन प्रणालीद्वारे संवाद साधला जाणार आहे. दु.३ ते ४.३० वाजेपर्यंत हा कार्यक्रम असून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त याचे आयझन करणेत आले आहे. जिल्ह्यातील सर्व सरपंच यांच्यासाठी सरपंच स्वच्छता संवाद या उपक्रमाचे आयोजन करणेत आले आहे.

कार्यक्रमप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सर्व विषय समितीचे सभापती यांची प्रमुख उपस्थिती आहे.

पंचायत समितीचे सर्व सभापती , जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य व सर्व सरपंच यांना सहभागी होण्यासाठी लिंक उपलब्ध करून देणेत आली आहे. याबाबत माहिती देताना प्रकल्प संचालक स्मिता पाटील म्हणाल्या, जिल्हा परिषदेमधून स्वच्छता संवाद उपक्रमांत जिल्हा कक्षातून यांचे नियोजन करणेत आले आहे. शाश्वत स्वच्छतेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून उपक्रम घेणेचे सूचना आहेत. त्यानुसार या उपक्रमाचे आयोजन करणेत आले आहे. तरी सर्व सरपंच व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करणेत येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!