गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तरचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिल्या पोलिस पाटलांना महत्वाच्या सुचना
अक्कलकोट, दि.८ : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटलांची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस पाटलांना नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी ग्रामीण भागातील ‘गणेश मंडळांना’ गणेश उत्सव साजरा करणेबाबत शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचना व कोरोनाच्या अनुषंगाने घेण्याची खबरदारी पोलीस पाटील यांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक गणेश उत्सव मंडळांना सुचना देता येतील म्हणून ‘पोलीस पाटील’ बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.
यामध्ये गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा,गर्दी होणार नाही, आगमनाची व विसर्जनाची मिरवणूक नाही तसेच सार्वजनिक ठिकाणी/रस्त्यावर मंडप टाकून मंडप टाकून श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करणार नाही याची दक्षता घेतील असे गावातील गणेश मंडळांना आपण सूचना द्याव्यात कोणत्याही परिस्थितीत मिरवणूक, बँड ,डीजे यांना परवानगी नाही.
कोरोनामुळे गणेशोत्सव साध्या पध्दतीने व शांततेत पार पाडणे बाबत आवाहन केले. त्याचबरोबर गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवावी गावातील अलार्म सिस्टीम व सीसीटीव्ही कॅमेरे ग्रामपंचायतच्या मार्फत बसवुन घेणेबाबत पाठपुरावा करावा.पोलीस अधीक्षक सातपूते यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन परिवर्तन सोलापूर जिल्ह्यात सुरू झाले आहे. आपल्या गावात हातभट्टीचे व्यवसाय व दारू विक्री करणारे यांची माहिती आम्हास द्यावी, आम्ही त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करू, त्यांना पर्यायी व्यवसाय करण्यासाठी योग्य ते सहकार्य करू असे सांगून पोलीस पाटील यांनी आपले गाव,सुरक्षित गाव कसे राहील याबाबत दक्ष राहण्यास सांगितले.
ग्रामीण भागातील पस्तीस गावचे पोलीस पाटील , पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, गोपनीय अंमलदार धनराज शिंदे , गजानन शिंदे हे उपस्थित होते.