सोलापूर,दि.१६ : राज्य शासनाच्या आदेशानुसार कोविड -१९ साठी देण्यात आलेल्या आदेशानुसार होम डिलिव्हरी करणारी व्यक्ती अथवा हॉटेल,ई-कॉमर्स इतर लोकांना ये-जा करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ई-पास
देण्यात येणार आहे.
त्यासाठी उद्यापासून महापालिकेच्या वेबसाईटवरती हॉटेल, ई-कॉमर्स, यांच्या आस्थापना विभागाच्या संबंधितांनी ऑनलाइन अर्ज करावे.त्याची अंमलबजावणी सोमवार पासून करण्यात येणार आहे.अर्ज करत असताना त्या व्यक्तीचा फोटो,आधार कार्ड व rt-pcr चाचणी केलेली निगेटिव्ह सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. रजिस्टर झाल्यानंतर आपल्या अर्जाची तपासणी केल्यानंतर 1 तासात पास देण्यात येईल.
ई-पास करिता कुठेही जाण्याची गरज नाही त्यांनी फक्त महापालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे ई.पास आहे त्यांनाच फिरत येईल.
ई-पास नाही त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली.