ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्री काशीलिंग सामुदायिक विवाह सोहळ्याचे २२ एप्रिल रोजी आयोजन ;  मल्लिकार्जुन पाटील यांची माहिती

अक्कलकोट,दि.१५ : जेऊर (ता.अक्कलकोट) येथे श्री काशीलिंग बहुऊद्देशिय संस्थेच्यावतीने शनिवार दि.२२ एप्रिल रोजी सायंकाळी ६:४५ वाजता अक्कलकोट रोडवरील श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक भवन जेऊर येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली. यावेळी काशी जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी, श्री शिवकुमार महास्वामी, श्री जडेय शांतिलिंगेश्वर महास्वामी, श्री शिवानंद शिवयोगी महास्वामी, श्री बसवलिंग शिवयोगी महास्वामी, शिवयोगी शिवाचार्य महास्वामी, निळकंठ शिवाचार्य महास्वामी, श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, राजशेखर शिवाचार्य महास्वामी, मळेंद्र महास्वामी, श्री अभिनव बसवलिंग महास्वामी, शांतलींग शिवाचार्य महास्वामी, महानंदा ताई मुगळी, सोमलिंग घुळी महाराज, सद्गुरू पांडुरंग महाराज, पिरजादे बाबा, कुंभार मठ, मादन हिप्परगा, इब्राहिमपूर आदी मठाधिश उपस्थित राहणार आहेत.

याचवेळी अक्कलकोट तालुक्यातील रहिवाशी परंतु सध्या देशाच्या विविध भागातील सिमेवर देश रक्षण करीत असलेल्या सैनिक बांधवांचा सन्मान सोहळा देखील होणार आहे.ग्रामीण भागात सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे आर्थिक अडचण तसेच वाढत चाललेली प्रचंड महागाई यामुळे नागरिकांना आपल्या मुलामुलींची लग्ने लावणे आणि त्याची जबाबदारी हे खूपच खर्चिक आणि न झेपणारे ठरत आहे.श्री काशीलिंग देवस्थान ट्रस्ट व बहुऊद्देशिय संस्थेच्या वतीने यंदा जेऊरला कोरोनाकाळ वगळता सलग सहाव्या वर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजीला जात आहे.या संस्थेत एकूण २०० मित्रपरिवार सदस्य एकत्र येऊन तन,मन धनाने योगदान देत आहेत.काशीलिंग बहुउद्देशीय संस्थेच्या मल्लिकार्जुन पाटील व मित्रपरिवारांकडून ४ वर्षात १३४ जोडपे विवाहबद्ध झाली आहेत.

तर चालू वर्षी सुद्धा जोडप्यांचा विवाह सोहळा त्यात्या धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे पार पडणार आहे.या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.दरवर्षी साधारण पन्नास हजार वर्हाडी उपस्थित राहत असतात. यात प्रामुख्याने वधू वरांना पोशाख, मणी-मंगळसूत्र,वऱ्हाडी मंडळींना, गावातील मुख्य रस्त्यावरून वधू वरांची मिरवणूक, भोजन,शिदोरी आदींची व्यवस्था केली आहे. या विवाह सोहळ्याचे नियोजन काशीलिंग देवस्थान ट्रस्ट व काशिलिंग बहुउद्देशीय संस्था तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी जेऊर हे करीत आहेत मंडळी करीत आहेत.

यावेळी अक्कलकोट तालुक्यातील पत्रकार बांधवाचा देखील पत्रकार दिनाचे औचित्य साधत सन्मान करण्यात आला.या पत्रकार परिषदेस मल्लिकार्जुन पाटील, शिवाजीराव कलमदाणे,उपसरपंच काशिनाथ पाटील,सुरेश सोनार, काशिनाथ कवठे, शिवनिंगप्पा पत्रिगीडा,काशिनाथ रामपुरे, इरण्णा कणमुसे, अंबाराया कनोजी,शिवराज स्वामी,इरप्पा कोळी,शिवराज बोरिकरजगी,मल्लीनाथ चौलगी,सिद्धाराम कापसे,मल्लिनाथ करपे,रमेश गोगावे,काशिनाथ कापसे,मल्लिनाथ मणुरे, महेशकुमार चानकोटे,सिद्धाराम बामणे, शिवपुत्र चौलगी,सिद्धाराम चौधरी,बसवराज वग्गे,रवि स्वामी आदींची उपस्थिती होती.

 

सैनिकांचा होणार सन्मान

आपले कुटुंब सोडून हजारो किलोमीटर दुर राहून आपल्या देशासाठी लढत असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील सध्या सिमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांचा अभिमान बाळगून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत त्यांचा सन्मान सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने केला जाणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!