पुणे, दि.5 जून: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सहा जून रोजी असतो. हा राज्याभिषेक दिन महाराष्ट्र शासनाने शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांचे विविध विकासात्मक पैलू लोकांसमोर यावेत याकरीता उद्या 6 जून रोजी माहिती कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयेाजन करुन समाजमाध्यमाद्वारे प्रसारण करण्यात करण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाचे माहिती उपसंचालक ( प्रभारी ) युवराज पाटील यांनी दिली आहे.
पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी “छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा विकासाचा दृष्टिकोन ” या विषयावर मांडलेले विचार सकाळी 11 वाजता ऐकता येणार आहेत.
#शिवस्वराज्यदिन हा हॅशटॅग माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनने तयार केला असून हा हॅशटॅग वापरून महाराजांच्या कार्याचे विविध पैलू कार्यालयाच्या ट्विटर हँडल ट्विट करण्यात येत आहे.
विभागीय माहिती कार्यालयाच्या फेसबुकची पेज https://www.facebook.com/ddipune लिंकवर कार्यक्रम बघता येणार आहे. ट्विटर हँडलची https://twitter.com/InfoDivPune लिंक आहे.