सोलापूर (प्रतिनिधी) : लोकमंगल सहकारी बँकेच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेचे अध्यक्ष, आ. सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेनुसार ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या या व्याखानमालेत सुमारे साडेसात हजार जणांनी सहभाग नोंदवाला होता.
सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे बँकेचा 23 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदा प्रथमच बँकेच्यावतीने एक आगळावेगळा उपक्रम म्हणून ऑनलाईन म्हणजे झूम ऍपद्वारे व्याख्यानमाला घेण्यात आली.
व्याख्यानमालेत एवढ्या जास्त लोकांचा सहभाग करून घेणारी लोकमंगल बँक ही एकमेव संस्था ठरली आहे. विशेष म्हणजे लोकमंगल बँकेने या आयोजनाची जबाबदारी कर्मचार्यांवर टाकली होती. जवळपास आठ-दहा कर्मचार्यांनी वक्ते, विषय आणि वेळ निवडण्याचे काम केले. 28 एप्रिलपासून दररोज 4 ते 5 व्याख्याने झाली. वक्त्यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बसवेश्वर महाराजांसह सध्याच्या कोरोनाचा काळ, त्यावर घ्यायाची काळजी यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे लोक घरीच बसलेले आहेत. त्यामुळे व्याख्यानमालेला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.