ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जयहिंद परिवाराच्या सत्काराने भारावलो; नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.५ : सोलापूर जिल्ह्यात जयहिंद परिवाराची घौडदौड ही यशस्वी अन् आदर्शवत ठरली आहे. मी जयहिंद परिवारामधलाच घटक आहे. आज या परिवाराचा सत्कार स्वीकारताना विलक्षण असा आनंद होत आहे. सोलापुर जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात जयहिंद परिवाराने मिळविलेली लोकप्रियता वाखाणण्याजोगी असल्याचे गौरवोद्गार राज्याचे महसूल मंत्री तथा नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले. सोलापुर जिल्ह्याच्या नूतन पालकमंत्रीपदी राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांची निवड झाल्याबद्दल जय हिंद परिवाराच्यावतीने सोलापूर येथील जय हिंद हाउसमधील हॉटेल शनायाच्या प्रांगणात कौटुंबिक सत्कार सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख,भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान अवताडे, जयहिंद परिवाराचे संस्थापक भास्करराव माने देशमुख, चेअरमन गणेश माने देशमुख, तज्ञ मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख, शालिवहन माने देशमुख, माढा येथील सहकार महर्षी गणपतराव साठे सेवाभाव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप साठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की,एकेकाळी सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जायचा. परंतु आज पश्चिम महाराष्ट्रात सर्वच बाबतीत हा जिल्हा आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जयहिंद परिवाराने सामाजिक उपक्रमासोबतच औद्योगिक क्षेत्रात गरूडझेप घेतल्याचे गौरवोद्गार काढले.

जयहिंद शुगरच्यावतीने नुतन पालकमंत्र्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन गणेश माने देशमुख यांनी केले.यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपण पालकमंत्री म्हणून सोलापूरचा पदभार स्वीकारला आहात,याचा आम्हाला आनंद आहे.नुतन मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतरही कोणत्याही परिस्थितीत आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही आपल्याकडेच असावी, असा मानस त्यांनी व्यक्त केला.

यावेळी व्हा.चेअरमन विक्रमसिंह पाटील, विजय पाटील, मोहन चिंतलकर, सचिन चव्हाण, रवीप्रकाश मेंगर, आर. गोकुळ, आचेगावचे सरपंच रमेश क्षीरसागर, मनगुळीचे संजय गायकवाड, विलास लोकरे, बाबासाहेब निंबाळकर यांच्यासह जयहिंद परिवारातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मारूती बावडे यांनी केले.

 

सोलापूरचा शाश्वत विकास व्हावा

सोलापूर जिल्ह्याला मोठा धार्मिक वारसा लाभलेला आहे. अक्कलकोट,पंढरपुर,सिध्देश्वरांचे ऐतिहासिक मंदिर आदी भक्तीपीठांमुळे येथील धार्मिक पर्यटनास वाव दिल्यास विकास शक्य आहे. सोलापुरचा शाश्वत विकास व्हावा, यासाठी आगामी काळात पक्षपात न करता विकासासाठी प्रयत्नशील राहणार असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!