ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंढरपूर मंदिर समितीकडून मुख्यमंत्र्यांना आषाढीचे निमंत्रण

पंढरपूर, दि.५ : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले. यासमयी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन त्यांचा सन्मान केला.

याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प.श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समिती कार्यकारी अधिकारी श्री.गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!