ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकरी संवाद रथयात्रेचे मुरूम शहरात उत्साहात स्वागत ; संभाजी ब्रिगेडचा अनोखा उपक्रम

मुरूम : शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळायलाच हवे या उद्देशाने “शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात” या उदात्त हेतूने संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्हाभर शेतकरी संवाद रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्याच निमित्ताने मुरूम शहरात आज संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करण्यात आलेल्या शेतकरी संवाद रथयात्रेचे आगमन झले असता स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी अजित चौधरी, आनंद कांबळे यांनी रथयात्रेस शुभेच्छा दिल्या तर जिल्हा संघटक धनराज बिराजदार, जिल्हाध्यक्ष शरद पवार यांनी संपूर्णतः रथयात्रेची जिल्हाभर राबवत असलेली रूपरेषा व रथयात्रेचे उद्दिष्ट, ध्येय मांडले. शेतकरी, कष्टकरी, महिला, विध्यार्थी तरुणांचे कोणत्याही प्रकारचे प्रश्न, समस्या व त्यावर उपाय याबाबत संभाजी ब्रिगेड येत्या काळात जिल्हाभर उपक्रम राबवणार आहे याबद्दल माहिती देत मनोगत व्यक्त केले.

तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिवादन करून पुष्पहार घालण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्या शेतकरी संवाद रथयात्रेसोबत आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांना शिवचरित्र ग्रंथसाहित्य भेट देण्यात आले.

या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार, जिल्हा संघटक धनराज बिराजदार, उमरगा तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार, शहर कार्याध्यक्ष लक्ष्मण शिंदे, लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी यादव, तालुका सचिव लक्ष्मण पवार, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल पाटील, संजय सावंत, शहराध्यक्ष श्रीधर इंगळे, मोहन जाधव, अजिंक्य मुरूमकर, किशोर आळंगे, अन्वर भाई, प्रणित गायकवाड, सागर बिराजदार, पृथ्वी चौधरी, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे अजित चौधरी, सरकार भिमराज ग्रुपचे आनंद कांबळे, टिपू सुलतान ग्रुपचे बाबा कुरेशी, पत्रकार नाहीरपाशा मासुलदार, अजिंक्य मुरुमकर तसेच मराठा सेवा संघाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव व तरुण बांधव उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन जाधव, प्रास्ताविक आण्णासाहेब पवार यांनी केले तर अजिंक्य मुरूमकर यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!