नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे पायी वारी काढण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी दिली जावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. संत नामदेव संस्थान नरसी नामदेव यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. २५० पालख्यांना पायी वारी काढण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या सुनावणीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढीची पायी वारी यंदा रद्द करण्यात आली आहे. वारीसाठी राज्यातील संत निवृत्ती महाराज त्र्यंबकेश्वर, संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी, संत सोपान काका महाराज सासवड, संत मुक्ताबाई मुक्ताईनगर, संत तुकाराम महाराज देहू, संत नामदेव महाराज पंढरपूर आणि इतर तीन असे एकुण १० मानाच्या पालख्यांना सरकारने परवानगी दिली आहे.
या सर्व पालख्या बसमधून जाणार आहेत. यासाठी राज्य सरकारकडून विस बसेस दिले जाणार आहेत.