मुंबईः देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. आज गुरुवारीही तेल कंपन्यांनी दरवाढ केली आहे. याचा परिणाम मह्णून आता मुंबईत पेट्रोलने 96 रुपयांची पातळी गाठली आहे. आज पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलमध्ये 32 पैसे वाढ केली. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव 96.32 रुपये झाला आहे.
दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमती आता 90 रुपये लीटरच्या जवळपास आहेत. या किंमती 89.88 एवढ्या आहे. डिझेल येथे 80 रुपये 27 पैसे लीटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 96.32 आणि डीझेल 87.36 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. आज पेट्रोल 35 आणि डीझेलने 32 पैशांनी वाढ झाली.
या महिन्यात गेल्या 14 दिवसांमध्ये 12 व्या वेळा पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे. या दरम्यान दिल्लीत पेट्रोल 3.58 रुपये आणि डीझेल 3.79 रुपये महाग झाले. यापूर्वी जानेवारीमध्ये रेट 10 वेळा वाढले होते. या दरम्यान पेट्रोल 2.59 रुपये आणि डीझेल 2.61रुपयांनी महाग होते. यावर्षी आतापर्यंत 22 वेळा पेट्रेल 6.17 रुपये आणि डिझेल 6.50 रुपये प्रति लीटरने महाग झाले आहे.