ध्यास विश्वसार्ह बातमीचा

औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवडचा बजेट सादर; हजार कोटींचे नियोजन

पिंपरी : सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०२१-२२या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प आज गुरुवारी १८ रोजी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आले. ५ हजार ५८८ कोटी ७८ लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह ७ हजार ११२कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त राजेश पाटील यांनी सादर केला. महापालिकेचा हा ३१ वा अर्थसंकल्प आहे. स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, विकास ढाकणे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. तर, नवनिर्वाचित आयुक्त राजेश पाटील यांचा पहिला अर्थसंकल्प आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प आज सकाळी साडेदहाच्या सुमारास सादर होणार होता. मात्र पाचच सदस्य उपस्थित असल्याने सभा कामकाज काही काळ तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर एक तासांनी आठ सदस्य आल्यानंतर सभा कामकाज सुरू झाले. सभेला शिवसेना गटनेते राहुल कलाटे, भाजपच्या भामा फुगे आरती चोंधे, संतोष कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे पंकज भालेकर, पंकज भालेकर, राजेंद्र लांडगे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!