ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी २४ वर्षांनंतर आज मतदान, मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत

दिल्ली : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी तब्बल २४ वर्षांनंतर आज मतदान होत आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गादीनधि यांचे निकटवर्तिय मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होत आहे. देशभरातील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात नऊ हजार प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सोमवारी मतदानाला आज सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. प्रतिनिधींना दुपारी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत निश्चित करण्यात आली होती. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाने सांगितले की, निवडणुकीत ३६ मतदान केंद्रे, ६७ बूथ असतील. जास्तीत जास्त ६ बूथ यूपीमध्ये असतील. प्रत्येक २०० प्रतिनिधींसाठी एक बूथ तयार करण्यात आले आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले राहुल गांधी यांच्यासह ४७ प्रतिनिधी कर्नाटकातील बळळारी येथे मतदान करणार आहेत. यात्रेच्या शिबिरात स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे.

या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, आ. कृष्णा पुनिया हे मतपेट्या घेऊन मुंबईत आले आहेत. आज त्यांनी टिळक भवन येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. जे प्रदेश प्रदेश प्रतिनिधी मतदार आहेत, त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बारकोड असलेले ओळखपत्र दिलेले आहे. ते ओळखपत्र आणि दुसरे कुठलाही फोटो पुरावा ओळखपत्र जसे की मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक यापैकी एक अशी दोन्ही ओळखपत्रे दाखवल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!