ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात म्हेत्रे घराण्याने विकासाचे राजकारण केले, सातनदुधनी येथे विकास कामाचे भूमिपूजन

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यात मागच्या वीस वर्षापासून म्हेत्रे घराण्याने विकासाचे राजकारण केले आहे.
ते यापुढेही कायम ठेवून प्रत्येक गावच्या विकासाचा अनुशेष भरून काढू,असे प्रतिपादन दुधनी बाजार समितीचे
सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी केले.अक्कलकोट तालुक्यातील सातनदुधनी येथे ग्रामपंचायतीमार्फत दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत कामाचे भूमिपूजन करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की, तालुक्यात बहुतांश ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे त्यामुळे जी काही विकास कामे होत आहेत ते आमच्या मार्फतच होत आहे सध्या आघाडीचे सरकार असल्यामुळे हा निधी आमच्या सरकार मार्फतच गावोगावी मिळत मिळत आहे आणि विकास कामे मार्गी लागत आहेत,
असे ते म्हणाले. यावेळी पंचायत समितीचे
सभापती आनंद कांबळे, तालुका युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील,सातनदुधनीचे सरपंच विठ्ठल राव, सिद्धू खताळ , ग्रामपंचायत सदस्य रतन राठोड,प्रभू काळे, खंडू शिंदे, भीमराव अरबाळे, राजेंद्र पांढरे, मल्लिनाथ पाटील ,मधुकर काणेकर,पुंडा काळे,शिवराया जमादार ,अशोक काळे, धोंडीबा खरात, धोंडीबा काळे,मकाळी खरात,गणपती खताळ, पांडुरंग काळे, अप्‍पाशा काळे, संतोष शिंदे, हमिद
गीलकी, परमेश्वर शिंदे, अनिल
स्वामी, गणेश काळे, धुळोबा वाघमोडे, सुनील सरवदे, विठ्ठल वाघमोडे, खंडू देवकते, सिद्धाराम काळे, मुतु तळकेरी
आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!