नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करतात. विविध राजकीय मुद्द्यांवरून राहुल गांधी मोदींना टार्गेट करतात, आजही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले आहे. आज फेब्रुवारीच्या ‘मन की बात’ कार्यक्रमापूर्वीच राहुल गांधींनी मोदींना लक्ष केले आहे. हिम्मत असेल तर ‘मन की बात’मध्ये मोदींनी ‘किसान की बात’, ‘जॉब की बात’ करावे असे आव्हान राहुल गांधींनी दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी देशातील जनतेशी संवाद साधतात. विविध मुद्द्यांवर ते बोलतात. या महिन्यात देशभरात सोशल मीडियावर ‘जॉब दो’ ही मोहीम चालविण्यात आली. त्यावरूनच राहुल गांधींनी मोदींना लक्ष केले आहे.