अक्कलकोट शहरातील नागरी समस्यांची सोडवणूक करून गोरगरीब जनतेला व व्यापारी बांधवांना नागरी सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – चंद्रकांत वेदपाठक
अक्कलकोट दि.12 – “अक्कलकोट शहरातील नागरी समस्यांची सोडवणूक करून गोरगरीब जनतेला व व्यापारी बांधवांना नागरी सुविधा देण्यास प्राधान्य द्यावेत ” अश्या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना “बाळासाहेबांची शिवसेना शहर संघटक चंद्रकांत वेदपाठक यांनी केली आहे.
तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरात विविध ठिकाणी व रस्त्याच्या कडेला रस्ता सोडून मोठी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी व्यापारी गाळे बांधून सोय करावीत,शहराला दररोज पाणी पुरवठा करावा, रस्त्यावरील लहान मोठे खड्डे बुजव्यात,पुरेसे शौचालय व मुतारी बांधावेत आणि असलेल्यांची दररोज साफ करावेत ,भक्तासाठी दोन्ही मंदिराजवळ कायम स्वरुपी वाहन तळ ची व्यवस्था करावी,रात्रीच्या वेळी अंधाराच्या ठिकाणी पुरेसे लाईट ची सोय करावी अश्या नागरी समस्या ची सोडवणूक करून जनतेला सुविधा द्यावेत ” अश्या मागणीचे निवेदन न.प. मुख्याधिकारी यांना दिले आहेत.
यावेळी चंद्रकांत वेदपाठक, तालुका प्रमुख संजय देशमुख,तालुका संघटक सूर्यकांत कडबागवकर ,शहर प्रमुख योगेश पवार, कामगार सेना प्रमुख स्वामिनाथ हेगडे,तालुका महिला आघाडी प्रमुख वर्षाताई चव्हाण, शहर प्रमुख वैशाली हावनुर, व युवा सेना शहर प्रमुख विनोद मदने सह कार्यकर्ते उपस्थित होते.