सोलापूर,दि.3: धनगर समाजाचे विद्यार्थी उच्च शिक्षणात मागे पडू नयेत, उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे यासाठी या समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये शिक्षण देण्याचे शासनाचे धोरण आहे. शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळा चालविण्यात येत असलेल्या संस्थेने शासन निर्णयातील नमूद अटीनुसार विहित नमुन्यात प्रस्ताव सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावा.
धनगर समाजातील जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांना दरवर्षी इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता 1लीपासून इयत्ता 12 वीपर्यंत शिक्षण देण्यास 4 सप्टेंबर 2019 अन्वये शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येतो.