ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोविड 19 मुळे मयत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना रु 50.00 लक्ष चा विमा लाभाचे धनादेश पालक मंत्र्यांच्या हस्ते प्रदान

सोलापूर : जिल्हयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते कोविड-19 मुळे मयत झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या वारसांना रु.  50.00 लक्ष विमा लाभ देण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वाती शटगार, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, जि प सदस्य थोरात, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी आल्लडवाड उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या कालावधीत सर्व्हेक्षण व इतर कर्तव्ये बजावत असताना कोविड-19 बाधीत होऊन सोलापूर जिल्हयातील दोन अंगणवाडी सेविका मयत झाल्या होत्या.  अक्कलकोट प्रकल्पातील सेविका सगरी व वैराग प्रकल्पातील सेविका गुरव अशा मयत झालेल्या सेविकांची नावे आहेत. सदर सेविकांच्या वारसदारांना महिला व बालविकास विभागामार्फत विमा स्वरूपात रु 50.00 लक्ष प्रत्येकी असा लाभ यापूर्वी मंजूर झाला आहे. पालकमंत्री सोलापूर यांचे हस्ते सदर वारसदारांना धनादेशाचे वाटप आज करण्यात आले.

कोरोना कालावधीत जिल्हयातील अंगणवाडी सेविकांनी मोलाचे कार्य केले आहे. सर्व्हेक्षण असो आरोग्य तपासणी कँपचे नियोजन तसेच लसीकरण यामध्ये सेविकांचा सक्रीय सहभाग राहिलेला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे माझे कुटुंब माझी जबाबदारी व माझे मुल माझी जबाबदारी या अभियानामध्ये देखील अंगणवाडी सेविकांनी सक्रीय सहभाग नोंदवून कामकाज केलेले आहे.

यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी होळकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गिरीश जाधव, विस्तार अधिकारी श्रीकांत मेहेरकर व संबंधीत प्रकल्पातील पर्यवेक्षिका अश्विनी चटमुटगे व जयश्री गुंड आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!