ध्यास विश्वसार्ह बातमीचा

येस न्यूज मराठी सायकल विशेष अंकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

सोलापूर : येस न्यूज मराठीच्या तिसऱ्या वर्धापन दिनी पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी आणि सायकल चे महत्व पटवून देण्यासाठी काढण्यात आलेल्या सायकल विशेषांकाचे प्रकाशन पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी अवंतीनगर येथे करण्यात आले यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उद्योजक गिरीश दर्बी, येस मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे उपस्थित होते. या वर्धापन दिन सोहळ्यास महापालिकेतील विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, किसन जाधव , चाकूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, ह भ प सुधाकर इंगळे महाराज, सोलापूर विद्यापीठाच्या जर्नालिझम डिपारमेंट चे प्रमुख रवींद्र चिंचोळकर, भाजपचे इंद्रजीत पवार यांच्या हस्ते प्रविण ननवरे, योगा शिक्षिका सुधा अळीमोरे, महेश बिराजदार, महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक सुरेश पाटील, नगरसेविका राजश्री चव्हाण, सोलापूर चेंबर्सचे अध्यक्ष राजू राठी, लोकमंगल बँकेचे सरव्यवस्थापकदिनकर देशमुख, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश फलमारी, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉक्टर प्रविण ननवरे, अमेय केत, महेश बिराजदार, श्रीमंत पवार, जगदीश पाटील, चंद्रकांत दुधाळ, अविनाश देवडकर, बालाजी सुरवसे, मारुती हाके, प्रवीण कदम, प्रभाकर चव्हाण, शशिकांत जगताप या सायकलपट्टूना रोप आणि सायकल विशेषांक देऊन गौरविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!