पुणे: राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथे आढळून येते आहेत. दरम्यान वाढती कोरोना बधितांची संख्या लक्षात घेता पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ करण्यात आली आहे. पुण्यातील कंटेन्मेंट झोनची संख्या 62 इतकी झाली आहे. सर्वाधिक कंटेन्मेंट झोन शिवाजी नगर भागात आहे. पुण्यातील निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहे. नाशिकमध्येही कोरोनाचे नियम अधिक कठोर केले गेले आहे. आठवड्याच्या शेवटी लॉकडाउन असणार आहे. 15 मार्चनंतर लग्न समारंभावर बंदी असणार आहे.
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]