गोवा : गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराचं काम पाहणार्याग राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या कंपनीवर धाड पडली आहे. या कारवाईत एका कर्मचार्यायला अटक करण्यात आली आहे. प्रशांत किशोर हे गेली अडीच वर्षं तृणमूल काँग्रेससाठी रणनीती तयार करत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रशांत आणि टीएमसीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याची चर्चा ही सुरू झाली होती.
गोवा पोलिसांनी शुक्रवारी परवरी भागातील अनेक बंगल्यांवर छापेमारी केली. या परिसरातील आठ बंगले हे प्रशांत किशोर यांच्या आयपॅक या कंपनीने भाडे तत्त्वावर घेतले आहेत. या बंगल्यांवर मारलेल्या छाप्यात एका २८ वर्षीय कर्मचार्यायला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळ गांजा हा अंमली पदार्थ सापडला आहे. या कर्मचार्याय विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.