मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेहलोत यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. या संदर्भात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी सायंकाळी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन जवळपास दोन तास चर्चा केली. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली.
या दरम्यान सचिन पायलट यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावरून वादाला तोंड फोडले आहेत. काँग्रेस अध्यक्ष बनायचे असेलतर मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. काँग्रेसमध्ये कोणीही व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही, असे सचिन पायलट यांनी गेहलोत यांना सुनावले आहे. त्यावर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मी कुठे राहणार, कुठे नाही हे वेळ ठरवेल, असे उत्तर दिले आहे.