ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जागतिक नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या रुद्रांश पाटील याला राज्य सरकारकडून २ कोटी रुपयांचं बक्षीस

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील याला राज्य सरकार २ कोटी रुपये देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केलं आणि राज्य मंत्रिमंडळानेही त्याच्या अभिनंदनाचा ठराव केला.

कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत भारताचा नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांनी वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. २०२४ ला फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा पहिला कोटा त्याला मिळाला आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली आहे. रुद्रांश पाटील हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी गावचा रहिवासी असून तो सध्या ठाण्यात राहतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!