गुरुशांत माशाळ,
दुधनी : वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाकडून शर्तींचे प्रयत्न करून कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र त्याला ग्रामीण भागात खीळ बसला आहे. आरोग्य विभागाकडून सध्या 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात आहे. मात्र 45 वर्षावरील पुढील नागरिक हे अफवामुळे लसीकरणाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. 18 ते 44 या वयोगटातील तरुण पिढी लसीकरण करून घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र वयाच्या अटींमुळे त्यांना लस मिळत नाहीये.
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसी संदर्भात अफवा पसरवली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. कोरोना लस घेतल्या नंतर असं होतं, तसं होतं अशा प्रकारच्या पुड्या सोडले जात आहे. ते तात्काळ थांबवणं गरजेचे आहे. ग्रामीण भागातील नागरिक अफव्यांवर अधिक भरवसा देत असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. नागरिक लसीकरणास स्पष्टपणे नकार देत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करणे गरजेचे आहे.
जर ग्रामीण भागात राजकिय नेते, पुढारी, सेवाभावी संस्था यांनी पुढाकार घेतल्यास लसीकरणात नक्की गती येईल. निवडणुकीत मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी जी यंत्रणा राबविण्यात येते. त्या यंत्रणेची आता नित्तांत गरज लसीकरण केंद्रासाठी हवी आहे. कारण सध्या लस शिल्लक आहेत, मात्र लस घेणारे उपलब्ध नाहीत. अशी स्थिती ग्रामिण भागात पाहायला मिळत आहे. लसींसंदर्भात गैरसमज, गर्दीत कशाला जायचे, मला काही होत नाही, ही मानसिकता आणि इतर बाबींमुळे लस घेण्यासाठी लोक बाहेर पडत नसल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात लादले गेलेले निर्बंध देखील हटविण्यात आले आहे. बाजारपेठा सुरू झाले आहेत. याचा अर्थ अस नाही की, कोरोना संसर्ग संपला आणि आम्ही मोकळा झालो. प्रत्येकाने आरोग्य केंद्रात जाऊन लस घेणे गरजेचे आहे.
परंतु वयाच्या 45 च्या पुढील व्यक्तींनाच डोस असल्याने ज्येष्ठ मंडळी बाहेर पडत नाहीत असा अनुभव आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था यांनी पुढाकार घेऊन लसीकरणा संदर्भात नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.