ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट विधानसभा क्षेत्रासाठी पायाभूत विकासासाठी १ कोटी रुपये मंजूर , आमदार कल्याणशेट्टी यांची माहिती

 

अक्कलकोट, दि.२३ : ग्रामीण भागातील पायाभूत सुविधेत वाढ होऊन सार्वत्रिक विकास होण्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या २५१५ योजनेतून अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील १५ गावांमध्ये सुचविलेल्या सुमारे १ कोटी रुपयांच्या विकास निधीस मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.  लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे ही योजना आहे त्यातून १ कोटी रुपये विकास निधी मंजूर झाला आहे.
ज्यात पुढील कामांचा समावेश आहे
कासेगांव ता. द. सोलापूर, श्री. सावतामाळी मंदिर येथे सभागृह बांधकाम ( १० लाख),गुर्देहळ्ळी ता. द. सोलापूर, लक्ष्मी मंदीर येथे सभागृह बांधणे(६ लाख), कलप्पवाडी, रेवणसिध्देश्वर मंदीर येथे सभामंडप बांधणे (६ लाख),हन्नूर चैतन्य नगर येथे सांस्कृतिक सभागृह बांधणे (१५ लाख), हालहळ्ळी (मैं) येथील हनुमान मंदीर समोर सभामंडप बांधणे (६ लाख),बोरगांव देशमुख, हुसेनबाशा व इमाम देवस्थान समोर सभागृह बांधणे.
(८ लाख),हिळ्ळी येथील श्री.हनुमान मंदिरसमोर सभागृह बांधणे (८ लाख),पानमंगरुळ येथील चौडेश्वरी मंदीरसमोर सभागृह बांधणे (५ लाख),हत्तीकणबस येथील यल्लम्मा व रेणुका मंदीर येथे सभागृह बांधणे (७ लाख),तळेवाड येथील बारे इमाम-लालसाब मंदिरसमोर व्यासपीठ बांधणे ( ३ लाख), बोरोटी (खु) येथील दुर्गामाता मंदीरसमोर सभागृह बांधणे (५ लाख),भोसगा तांडा येथील सेवालाल मंदीरसमोर सभागृह बांधणे (५लाख), कडबगांव येथील लक्ष्मी मंदीरसमोर व्यासपीठ बांधणे( ४ लाख), वागदरी येथील वडार समाज येथे सभागृह बांधणे
(४ लाख),हत्तीकणबस येथील शंकरलिंग मंदीरसमोर बंदिस्त गटार बांधणे (३ लाख) असा एकूण १ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.आता या प्राप्त रक्कमेतून ग्रामीण भागातील नागरिकांच्या मागणीनूसार कामे होऊन प्रलंबित प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे तसेच ग्रामीण भागातील पायाभूत विकासास गती येऊन नागरिकांना आपल्याला हव्या असलेल्या कामास निधी मिळाल्याचे समाधान प्राप्त होणार आहे, असे आमदार कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!